“शासनाच्या हाती राक्षसी सत्ता असते. तीच गोष्ट शिकल्या-सुधारल्या मंडळींची. आपल्या वाढत्या सुखसोयी, चोचले पुरविण्यासाठी ते प्रसंगी निसर्गावर, त्यात राहणारा कडेकपारीतील अडाणी जनतेच्या अन्नावर उठतात. आपल्या लुटीला लूट न म्हणता ‘विकास’, ‘प्रगती’ अशी गोंडस नावे देतात. गुन्हेगारीला तत्वज्ञानाचा आधार देतात. सारे एक होतात.”

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.- पु. ल.”